जीवनाचे रहस्य आणि जीवन - WAY OF HAPPY LIFE

WAY OF HAPPY LIFE

This site explain to how to live in life AND how to create life successful.

ads

Ads Here

Wednesday 25 April 2018

जीवनाचे रहस्य आणि जीवन

Explain sunries

SUNRIES

Om



 सुखी जीवनाचा राजमार्ग   
 जीवनाचे रहस्य आणि जीवन       
 जगणे - एक कलाः                                                   
 जन्म माणसाचा अगर प्राण्याचा असो ! तो एक निसर्गाचा चमत्कारच आहे. जन्माला येताना प्रत्येक प्राणी रडतच येतो मरतानाही रडतच मरतो. आपण पाहतो काही व्यक्ती आयुष्यभर रडतच राहतात तर काही व्यक्ती दुख असतानाही हसतमुख राहतात. काही व्यक्ति छोट्या-छोट्या दुःखाचा मोठा बाऊ करतात त्यात गुरफटून जातात आणि मोठे दुःख येताच आत्महत्या करतात अथवा वेडे होतात. दुःख प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहे पण त्या दुखात किती गुरफटून घ्यावे हे प्रत्येकाने ठरवावयाचे आहे.                                    


मनुष्य गरीब घरातच अथवा श्रीमंत घराण्यात जन्म कसा घेतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. मनुष्याचा पूर्वजन्माच्या पाप-पुण्याच्या आधारावर तो श्रीमंत व गरीब घराण्यात जन्म घेतो असा पुराणात उल्लेख आढळतो.  परंतु जर गरीब घराण्यातील व्यक्ती ज्या अर्थी श्रीमंत होते [ उदा धीरूभाई अंबानी ] याचा अर्थ प्रयत्न हे पापपुण्यपेक्षाही श्रेष्ठ आहेत. जर आपण गरिब घरात जन्मलो आहोत तेव्हा आपण गरिब राहणारअसा विचार कधीही करू नये.                                                       
 दुःख हे मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. ज्या व्यक्तीचे मन कठोर असते त्याला कमी दुःख भासते  व  जो मनाने हळवा असतो त्यास दुःखाचा आभास जास्त होतो.आयुष्यात कोणते जास्त दुःख मानावे व कोणते मानू नये याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. वडिलांचा मृत्यू व स्वतःच्या मुलाचा मृत्यू यातील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. जन्माला आला तो आज न उद्या मरणारच पण तरुणाचा मृत्यू हा जास्त त्रासदायक असतो.                           
 जीवन जगताना छोट्या-छोट्या गोष्टींचा जास्त विचार न करता स्थितप्रज्ञ करण्यासाठी जगाचे निरीक्षण करावे. आपल्यापेक्षाही  जे जास्त दुःखी आहेत त्यांच्या कडे पहावे म्हणजे आपल्या दुखाची धार कमी होते.तसेच आपल्यापेक्षा सुखी असणाऱ्यांकडे पाहिले तर आपणास जास्त दुःखाचा  अनुभव येतो. जग हे फार मोठे पुस्तक आहे.त्याचे निरीक्षण आपणास अनेक गोष्टी शिकवते .                             
 जीवन जगताना दुसर्‍याचे दुःख अनुभवण्यास शिका.  तसेच आपल्या भोवती असणाऱ्या प्राण्यांचे हे दुःख अनुभवण्यास शिकल्यास आपल्या दुःखाची धार कमी झाल्याचे  भासते. आपल्यापेक्षा जे गरीब आहेत व जे दुःखी आहेत त्यांना आधार द्या होईल तेवढी मदत करा त्यांच्या दुःखात सहभागी व्हा याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच होईल. सभोवतालच्या प्राण्यांनाही होईल तेवढी मदत करा त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्कीच होतील. याचे कारण प्रत्येक आत्म्याचे संत असतात. त्या प्राण्याने मनुष्यरूपात असताना ज्या संतांची सेवा, भक्ती केली असते.  तो संत त्या प्राण्याच्या सुख आणि दुःखाकडे लक्ष ठेवून असतो. त्याला सुख मिळविण्यासाठी तो संत प्रयत्न करीत असतो.         

 अठरादशे पुराणैश्यु व्यासस्य वचनं द्वयंम । परोपकार पुण्याय पापाय पर पिडनेम् ।                                          

 परोपकार हे पुण्य आहे दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका ते पाप आहे .जेवढी दुसऱ्याला मदत करता येईल तेवढी मदत करा हे खरे सुखी आयुष्याचे गमक आहे. द्यावे तसे घ्यावे हा निसर्गाचा नियम आहे. द्यावे तसे  घ्यावे हा निसर्गनियम आहे.तुम्ही दुसऱ्याला दुःख दिले तर तुम्हाला दुःख मिळणार जर दुसऱ्याला सुख दिले तर सुख न चुकता तुम्हाला मिळणार.

No comments:

Post a Comment

JYADA JANAKARI KE LIYE COMMENT KARE

Positive Thought positive quotes change life

Hello friend Change your thoughts and your world will change. 3 ONCE YOU BECOME FEARLESS LIFE BECOMES LIMITLESS 5 If you want ...